बंडू : सांग पाहू डासाला कसं मारायचं.
बबडी : मला नाही बुव्वा माहीत
बंडू : वेडी गं वेडी सोप्प आहे. त्याला पकडयाचं त्याचे पाय बांधायचे आणि पोटात गुदगुदल्या करायच्या. मग तो हसणार. हा हा हा असं. त्यावेळी त्याचं तोंड उघडणार. आणि मग त्यांनी तोंड उघडलं ना की लगेच एक चमचा विष त्याच्या तोंडात घालायचं. मग तो मरून जाणार.(बच्चे लोक तालिया बजाव)
......
दगडू : ओ दुकानदार, केळी कशी दिली राव..
दुकानदार : एक रुपयाला एक
दगडू : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला.
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं केवळ साल येईल
दगडू : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला फक्त सालीशिवायचं केळं द्या पाहू.