गणू गुरुजी आणि नानू गुरुजी गप्पा मारत बसले असतात.
गणू गुरुजी : तुला सांगतो नू जर मला त्या अंबानीची पूर्ण प्रॉपर्टी मिळाली ना तर मी त्याच्याहूनही श्रीमंत होईन.
नानू गुरुजी : छे, कसं काय ते.
गणू गुरुजी : अरे त्या प्रॉपटीर्शिवाय मी सकाळ संध्याकाळ शिकवण्या घेऊनही वेगळं कमवेन ना.
===============================================================
दगडू : ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
दगडू : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला.
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
दगडू : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.
===================================================